जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद गावाजवळ गोमासची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला होता. या संदर्भात शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद कडून भुसावळ कडे जाणारी कार क्रमांक (एमएच 19 सीडब्ल्यू 3765) या कारचा अपघात शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता घडला होता. या अपघात ग्रस्त कारची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यावेळी या वाहनातून मोठ्या प्रमाणावर गोमास मिळून आले होते. पोलिसांनी हे गोमास जप्त केले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख इंद्र शेख कादर (वय 45 रा. शनिपेठ) शाहरुख खान आलम खान वय 32 रा. सुरत, फरहान (पूर्ण नाव माहित नाही) आणि रिक्षा चालक (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक ए.सी.मनोरे हे करीत आहे




