खंडणीप्रकरणी पितापुत्रावर गुन्हा दाखल; एक ताब्यात

चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुग्ध व्यावसायिकांकडून घेतलेल्या दुधाची साय प्लास्टिक सारखी दिसते. याची वाच्यता बाहेर करायची नसेल तर लाख रुपयांची मागणी करीत तडजोडी नंतर ७५ हजारांची रक्कम घेतल्या प्रकरणी पितापुत्रांवर चोपडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की. चोपडा शहरातील निर्मल डेअरीवरून ऋषी संजय पाटील हे दूध घेऊन गेले. तेव्हापासून १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान डेअरीचे प्रल्हाद बळीराम पाटील (वय-५५ ) धंदा व्यवसाय रा. प्लॉट नं १०८ गणेश कॉलनी चोपडा यांना वारंवार ऋषी संजय पाटील यांनी फोन करुन सांगीतले की, मी तुमच्या दुध डेअरी वरुन दुध घेवुन गेलो असुन त्याला तापवले असता त्याची साय ही प्लॅस्टीक सारखी आहे. असे सांगुन तसा त्या तापवलेल्या दुधाचा व्हीडीओ तयार करुन तो व्हीडीओ फिर्यादी यांना पाठवुन तो दुधाचा व्हीडीओ व्हायरल करु अशी धमकी दिली. तुम्हाला तुमची बदनामी होवु द्यायची नसेल तर आम्हांस १ लाख रूपये द्यावे लागतील असे सांगून ७५ हजार रूपये घेतले. याप्रकरणी प्रल्हाद पाटील यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संजय विक्रम पाटील व ऋषी संजय पाटील दोन्ही रा. बिडगाव ता. चोपडा ह.मु. सानेगुरुजी कॉलनी चोपडा ता. चोपडा यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे मारगदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र अशोक वल्टे हे करीत आहेत.

Protected Content