चोपडा, प्रतिनिधी । दहावी,बारावी नंतर काय ? या करियर गाईडन्स कार्यशाळेचे ऑनलाइन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रोटरी क्लब चोपडातर्फे आज सोमवार १३ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० ते ६.३० वाजता करण्यात आले आहे.
इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण कोणत्या शाखेत घ्यावे याचा निर्णय घेण्यासाठी उपयुक्त व साह्यभूत ठरणाऱ्या व सध्याची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन करिअर मार्गदर्शन शिबिराचे रोटरी क्लब चोपडा व एसएसएस मेंटोर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पीडीजी महेश मोकालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थी/ विद्यार्थिनी व पालक यांनी ८७६७८७१६९२ या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप करावा, नोंदणी केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना कार्यक्रमाचे आमंत्रण व्हाट्सअप द्वारे पाठवले जाणार आहे. ऑनलाईन करियर मार्गदर्शन शिबिरातून विद्यार्थ्यांना दहावी /बारावी नंतर काय ? याबाबत मार्गदर्शन होणार आहे. समीर प्रतिनिधी व योगेश यावलकर मार्गदर्शन करणार आहेत. तरी फक्त शंभर विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन खुले असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष नितीन अहिरराव ,प्रोजेक्ट चेअरमन गौरव महाले व सचिव रुपेश पाटील यांनी केले आहे..