जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग’ तसेच ‘इतर मागास बहुजन कल्याण विभागा’मार्फत योजनेपासून एकही मागासवर्गीय पात्र विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित प्राचार्यांनी घ्यावी. अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे केली आहे.
‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग’ तसेच ‘इतर मागास बहुजन कल्याण विभागा’मार्फत अनुसुचित जाती, इतर मागास वर्गीय, विजाभज व विशेष मागास प्रवर्ग यावर्गातील विद्यार्थ्यासाठी महाडिबीटी प्रणालीवर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीच्या विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येतात. यासाठी शिष्यवृत्तीच्या विविध योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी १४ डिसेंबर २०२१ पासून ‘महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागा’मार्फत कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. या योजनेपासून एकही मागासवर्गीय पात्र विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित प्राचार्यांनी घ्यावी. अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे केली आहे.
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक योजनांची महाडीबीटी प्रणालीवर प्रथम वर्षाच्या व नुतनीकरणाच्या अर्जाची नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विशेष शिबीरांचे आयोजन करणे, योजनांची महाविद्यालय स्तरावर व्यापक प्रसिध्दी करणे, त्याकरिता विविध उपाययोजना करणे, महाडिबीटी प्रणालीवर विद्यार्थ्याचे विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज शासनाने दिलेल्या विहीत मुदतीपूर्वी महाविद्यालयांनी विद्यार्थ्याकडून भरुन घेण्यात यावेत, तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेल्या अर्जाची तात्काळ पडताळणी करुन नियमानुसार पात्र असलेले सर्व अर्ज ऑनलाईन जिल्हा कार्यालयाच्या लॉगीनला दिलेल्या विहित मुदतीत पाठविण्याची प्राधान्याने कार्यवाही प्राचार्य यांनी करावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकान्वये कळविले आहे.