जळगाव, (प्रतिनिधी) शहरातील आव्हाणे रस्त्यावर के.सी.पार्कजवळ शनिवारी (दि.१८) सायंकाळी ५.४५ च्या सुमारास कट लागल्याने एक कार रस्त्याच्या कडेला नाल्यात उलटल्याची घटना घडली.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
आव्हाणे रस्त्यावर एका कारचा कट लागल्याने समोरून येणारी कार रस्त्याच्या कडेला नाल्यात उतरली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. अपघातात नाल्यात उतरलेल्या कारचा क्रमांक एमएच.३९.जे.४७८९ असा आहे.