समृद्धी महामार्गावर कारची ट्रकला धडक; २ जण ठार, ३ जखमी

वाशिम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. या महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर कार येऊन आदळल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बाप-लेकाचा समावेश आहे. समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात हा अपघात आहे. अपघातइतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे. कारमधून पाच जण प्रवास करत होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास वाशिममधीलसमृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील लोकेशन २१८ वर हा अपघात झाला. काहीतरी बिघाड झाल्यामुळे चालकानेट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेली कार ट्रकवर आदळली. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झालातर तीन जण जखमी झाले.

मृतांमध्ये ४५ वर्षीय वडील आणि त्यांच्या ७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. जखमींमध्ये २ महिलांचा समावेश आहे. अपघातग्रस्त कार नागपूरहून मुंबईकडे चालली होती. अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. आतील लोक कारमध्येच अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारचा समोरील भाग कटरने कापून आतील मृत व्यक्ती व जखमींना बाहेर काढले. जखमींना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

Protected Content