वॉशिंग्टन, वृत्तसंस्था | पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान याने आपण भारतावर हल्ला करु शकत नाही, असे म्हटले आहे. भारतावर हल्ला करणे हा पर्याय असू शकत नाही, असे मत त्यानी व्यक्त केले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित मदत न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आपण अपयशी झाल्याची कबुली दिली. काश्मीर मुद्द्यावर जागतिक स्तरावर मिळालेली प्रतिक्रिया निराशाजनक असल्याचेही त्याने म्हटले आहे.
जगाकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया मिळण्यामागचे कारण आपल्याला माहिती असल्याचे सांगताना इम्रान खान यानी जग भारताकडे १३० कोटी लोकांची एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहत असल्याचे सांगितले. यावेळी एका पत्रकाराने आता काय पर्याय आहे, असे विचारले असता इम्रान खानने म्हटले की, “आम्ही भारतावर हल्ला करु शकत नाही. हा पर्याय असू शकत नाही. याव्यतिरिक्त शक्य ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत.”