भुसावळ, प्रतिनिधी | भुसावळ मतदार संघातून मी विधानसभेसाठी उमेदवारी करीत आहे. मी मतदार संघाचा विकास करण्यासाठीच काम करेन, असे स्पष्ट आश्वासन देतो, लोकांनीही जातीचा मुद्दा सोडून विकास कामे करणाऱ्याला निवडून द्यावे, असे आवाहन ‘वंचित बहुजन आघाडी’चे (आंबेडकर गट) अधिकृत उमेदवार नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनी आज (दि.२४) येथे केले.
ते पुढे म्हणाले की, विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी मतदार संघात रेल्वे, ऑर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर व मोठी एम.आय.डी.सी. एवढे सगळे असतांना मतदार संघातील किती तरुणांना नोकरी लावली ? हा मोठा प्रश्न आहे. याउलट मी दीपनगर भागात काही तरुणांना याआधीच नोकरी लावली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.