उमेदवारांच्या प्रचाराची खर्च मर्यादांनी ‘इतक्या’ लाखांनी वाढ

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यात विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चात १२ लाखांनी वाढ झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी पत्रकार पारिषदेत दिली.

१५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने विधानसभेच्या २८८ जागांसाठी एकाच दिवशी २० नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे . त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी काकडे यांनी रावेर विधानसभा मतदारसंघा बाबत येथील तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती दिली. निवडणूकीसाठी आचार संहिता लागू झाल्यामुळे राजकीय पक्षाचे डिजिटल बॅनर, पोस्टर, काढण्याचे आदेश नगर पालिका, ग्रामपंचायती व राजकीय पक्षांना देण्यात आले आहे. निवडणूकीसाठी मागील पंचवार्षिक निवडणूकीत उमेदवारांना प्रचाराची खर्च मर्यादा २८ लाख होती. आता ती खर्च मर्यादा ४० लाख झाली आहे . यात १२ लाखांची प्रचारासाठी वाढ झाली आहे.

रावेर मतदारसंघात एकुण मतदार : ३ लाख ८ हजार २०९ यात पुरूष १ लाख ५७ हजार ८०८ तर महिला मतदार १ लाख ५० हजार ३७८ आहेत. तसेच ८५ वर्षा वरील मतदार ३१९७ , दिव्यांग १६८५ , सैन्य दलातील मतदार २६८ , तृतिय पंथी २ १ आक्टोबर रोजी १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदाराला २९ आक्टोबर पर्यन्त मतदार नोंदणी करता येणार आहे.

रावेर विधान सभा मतदार संघात ३२८ मतदान केंद्र आहेत. यासाठी २७०० कर्मचाऱ्यांची नियुक्ति करण्यात आली आहे . त्यांचे तीन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे . बी एल ओ मार्फत व्होटर स्लिप मतदारांना देण्यात येणार आहे. रावेर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे पासून मतमोजणीची प्रक्रिया येथील तहसील कार्यालयात होईल. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बी ए कापसे , सहायक गट शिक्षणाधिकारी के पी वानखेडे उपस्थित होते.

Protected Content