अमित शहांचा उमेदवारी अर्ज रद्द करा ; कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

images 1 2

अहमदाबाद (वृतसेवा ) भजपा अध्यक्ष अमित शहा यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर कॉंग्रेसने आक्षेप नोद्विला आहे. कॉंग्रेसने आक्षेप घेताना शहा यांनी उमेदवारी अर्जात काही लपवल्याचा आरोप करत त्यांची उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अमित शहा हे गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून रिंगणात उतरले असून,  काँग्रेसने त्यांच्याविरोधात सी.जे. चावडा यांना उमेदवारी दिली आहे.

 

उमेदवारी अर्ज दाखल करताना अमित शहा यांनी आपल्या शपथपत्रामध्ये काही माहिती लपवल्याचा आरोप करत काँग्रेसने याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. अमित शहा यांनी आपल्या शपथपत्रामध्ये दोन ठिकाणी चुकीची माहिती दिली, असा दावा काँग्रेसने केला आहे. अमित शहा यांनी गांधीनगरमध्ये असलेल्या एका प्लॉटबाबत आणि मुलाच्या कर्जाबाबत योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र  भाजपा प्रवक्ते भरत पांड्या यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधी पक्ष आणि त्यांचे उमेदवार अमित शहा यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत.  शहा यांनी कर्ज चुकते केले असून, गहाण ठेवलेली संपत्ती परत मिळवली आहे. काँग्रेस कुठलीही पडताळणी केल्याशिवाय आरोप करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

 

 

 

 

Add Comment

Protected Content