जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगावच्या प्लेसमेंट सेलद्वारे अंतिम वर्षाच्या बेसिक बी.एस्सी. नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला. या उपक्रमामध्ये ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व आपल्या व्यावसायिक नर्सिंग कारकिर्दीची सुरुवात करण्याची संधी साधली.


प्रसिद्ध आरोग्य सेवा भरती संस्था मेडी असिस्ट तर्फे ड्राइव्हचे आयोजन केले. या प्रक्रियेत मुलाखती, कौशल्य चाचण्या व विद्यार्थ्यांसोबत संवादाचा समावेश होता.गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती विशाखा गणवीर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यातील महाविद्यालयाच्या कटिबद्धतेवर भर दिला. तसेच, आरोग्य सेवा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये व आत्मविश्वास प्रदान करण्यात महाविद्यालयाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात उपप्राचार्या प्रा. जसनीत धया, प्रा. मनोरमा कश्यप, आणि प्रा. प्रियांका गवई , कल्याणी देवगडे यांची विशेष उपस्थिती होती.विद्यार्थ्यांनी या प्लेसमेंट ड्राइव्हला भरभरून प्रतिसाद दिला. अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय आणि मेडी असिस्ट यांचे आभार मानले मेडी असिस्टतर्फे व्यवस्थापक कोमल चौधरी,सहायक व्यवस्थापक नुपूर चौबे यांनी मुलाखत घेत विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे आणि क्षमतेचे कौतुक केले.


