बोदवड प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीत आयसीआयसीआय बँकेने निवड केली.
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड तसेच आय सी आय सी आय बॅक याचे संयुक्त विद्यमाने पदवीधर विद्यार्थ्यासाठी नुकतेच कँपस इंटरव्ह्यू म्हणजेच परीसर मुलाखातीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ७८ विद्यार्थ्याची लेखी परीक्षा तसेच संगणक द्वारे चाचणी परीक्षा घेण्यात आली व पात्र विद्यार्थ्याच्या मुलाखती आयसीआयसीआय बॅकेचे उप व्यवस्थापक श्री सामुद्रे यांनी घेतल्या त्यात २५ विद्यार्थी निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. या परीसर मुलाखतीचे आयोजन महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल व विद्यार्थी विकास कक्ष यांनी केले होते
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे बोदवड सार्व. को-ऑप. एज्यु. सोसा. लि. संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल, संस्थेचे उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा, अँड. प्रकाशचंद सुराणा, व संचालक यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्राचार्य अरविद चौधरी यांनी बोदवड महाविद्यालयात होतकरू व बुद्धिमान विद्यार्थी असल्याचे सांगून २५ विद्यार्थ्याची बॅकेतील निवड ही ऐतिहासिक घटना असल्याचे नमूद करून निवड झालेल्या विद्यार्थ्याना पुष्प देऊन अभिनंदन केले व शुभेछा दिल्या. या उपक्रमात उपप्राचार्य डी एस पाटील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. नरेंद्र जोशी, प्लेसमेंट सेल अध्यक्ष डॉ. विनोद चौधरी सदस्य डॉ. मनोज निकाळजे, डॉ. प्रभाकर महाले, प्रा. अजय पाटील प्रा. विशाल जोशी, प्रा. भाले यांनी परिश्रम घेतले.