Home Cities बोदवड मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांचा प्रचार

मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांचा प्रचार


बोदवड लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर बोदवड मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रोहिणी खडसे यांचा प्रचार दौरा सुरू आहे. मतदार संघातील विविध भागात जावून त्यांनी जनतेशी संवाद साधला.

त्यांनी बोदवड तालुक्यातील पळासखेडा, मुक्तळ, वाकी बोरगाव, वराड, सुरवाडे खु, सुरवाडे बु, मानमोडी, जलचक्र तांडा, जलचक्र खु, जलचक्र बु या गावांमधे प्रचार फेरी काढून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गावागावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उबाठा पक्ष महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मतदार संघातील गावांमध्ये त्यांचे महिलांकडून त्यांची औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रत्येक गावातून प्रचार रॅली काढण्यात आली.


Protected Content

Play sound