अमळनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच रिपाइं (कवाडे गट) महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यासाठी आज तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आला.
अमळनेर तालुक्यातील नंदगाव, लंडगाव, अमोदा ,तासखेडा, दरेंगाव, हिंगोना, मुडी, पिंगळवाडे, निंभोरा व कलाली आदी गावांमध्ये आज सकाळी गुलाबराव देवकर यांच्यासाठी प्रचार करण्यात आला. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पराग पाटील, सचिन पाटील कार्याध्यक्ष सुरेश तात्या, सुरेश दादा जेष्ठ नेते शिवाजी दाजभाऊ, डॉ किरण नाना, पं.स.सदस्य विनोद जाधव, प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रचार फेरीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.