भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाची महामारी पाहता भुसावळातील ज्येष्ठ छायाचित्रकार बांधवांनी मिळून सोशल डिस्टन पाळत घरीच कॅमेरा पुजन केले.
भुसावळ येथे गणेश पुरी मधील नरसिंग राठोड यांच्या घरी शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार नरसिंग राठोड यांनी कॅमेरा पुजन केले.
प्रास्तविक रेल्वे स्कुलचे कला शिक्षक राजेंद्र जावळे यांनी फोटोग्राफीवर आधारित कवीता सादर करून केली. त्यानंतर जुन्या छायाचित्रकारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शहरातील विवेक वणीकर, नरसिंग राठोड, राजेंद्र जावळे, अविनाश साळी, हरी बऱ्हाटे, श्याम गोविंदा, श्रीकांत पवार, गणेश राठोड, भरत शिंपी आदी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन अविनाश साळी यांनी केला, तर फोटोग्राफीबदद्ल मार्गदर्शन विवेक वणीकर यांनी केले, यशस्वीतेसाठी गणेश राठोड यांनी परिश्रम घेतले.