किसान सम्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

faijapur photo

फैजपूर, प्रतिनिधी | रावेर-यावल तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की, पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. या योजनेत अजूनही काही शेतकरी बांधवांनी आपली लाभार्थ्यांची नोंदणी केलेली नाही. ज्यांनी अद्यापही नोंदणी केली नसेल, त्यांनी त्वरित नोंदणी करावी.

 

नवीन लाभार्थ्यांनी आपली नोंदणी संगणकाच्या मदतीने ऑनलाइन पद्धतीने करू शकतात. असे आवाहन येथील प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे.
नोंदणीसाठी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यात Farmers corner या मेनुमधून New Farmer Registration या लिंकच वापर करावा. नोंदणी करण्यासाठी सदर व्यक्तीचे आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे स्वतःचे बचत खाते, तसेच 7/12उतारा व खाते उतारा या कागदपत्रांची नोंदणी करतांना आवश्यकता असेल.

तसेच ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत किंवा नाहीत, त्याबाबत Farmers Corner या मेनूमधून Beneficiary status या मध्ये क्लिक करून आधारकार्ड क्रमांक टाकून पीएम किसान सन्मान निधीची स्थिती जाणून घेता येवू शकते. सदरील कागदपत्रे आपण आपल्या गावातील तलाठी यांच्याकडे जाऊन या योजनेसाठी नोंदणी करता येवू शकते. तरी ज्यांची नोंदणी राहिली असेल, अशा शेतकरी बंधू-भगिनी यांनी आपली नोंदणी त्वरित करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. थोरबोले यांनी केले आहे.

Protected Content