Home Cities जळगाव आपत्कालीन परिस्थितीत ११२ हेल्पलाइनवर कॉल करा; पोलीस प्रशासनाचे आवाहन

आपत्कालीन परिस्थितीत ११२ हेल्पलाइनवर कॉल करा; पोलीस प्रशासनाचे आवाहन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ११२ हेल्पलाइनवर कॉल करावा आणि त्यांना १० मिनिटांच्या आत प्रतिसाद मिळेल, अशी माहिती पोलीस मुख्यालयात अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांनी १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दिली. ते म्हणाले की, राज्याच्या पोलीस विभागाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी ११२ हेल्पलाइन सेवा उपलब्ध केली आहे, जी प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असल्याचे सांगितले.

अशोक नखाते यांनी पुढे स्पष्ट केले की, ११२ हेल्पलाइनवर कॉल केल्यावर त्या कॉलचे लोकेशन हेड ऑफिसला मिळते, जे त्यानंतर संबंधित जिल्ह्याला वर्ग करते. त्यानंतर, कॉल लोकेशननुसार संबंधित पोलीस ठाण्याच्या ११२ हेल्पलाइनच्या दुचाकीशी जोडला जातो, आणि तेथील पोलिस कर्मचारी घटनास्थळी १० मिनिटांच्या आत पोहोचतात. त्यांनी सांगितले की, ११२ हेल्पलाइनचा वापर करून नागरिकांना त्वरित मदत मिळवण्याची व्यवस्था केली आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यातून एकूण २३ हजार ४५५ कॉल ११२ हेल्पलाइनवर आले होते, ज्यात प्रत्येक कॉलचे निराकरण आणि मदत पोलीस प्रशासनाने केली आहे. म्हणजे नागरिकांचा विश्वास आणि ११२ हेल्पलाइनच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरीकांनी आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवण्यासाठी अधिक उत्तम सुविधा मिळावी म्हणून निसंकोचपणे ११२ हेल्पलाईनवर कॉल करावा असे आवाहन अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांनी केले आहे.


Protected Content

Play sound