
भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ लालुक्यातील काहूरखेडा येथील सोलार प्लांटमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७५ हजार रुपये किमतीची केबल चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील देवराम महाले (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ फेब्रुवारी रात्री ११ ते २८ फेब्रुवारी सकाळी १० या कालावधीत अज्ञातांनी प्लांट परिसरातील सुमारे १३ किलोमीटर लांबीची स्ट्रिंग केबल कापून चोरून नेली.
घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. परिसरातील संशयितांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.



