मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असून उद्याच मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रीमंडळाचा तिसरा आणि सर्वात महत्वाचा विस्तार नेमका केव्हा होणार ? याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विस्तार प्रलंबीत असल्याने विशेष करून शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. तर बच्चू कडू यांच्यासारखे शिंदे गटाचे सहकारी अपक्ष आमदार देखील यावरून अस्वस्थ झाले आहेत.
या पार्श्वभूमिवर, आज सायंकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रीमंडळाच्या आगामी विस्ताराबाबत चर्चा होऊन उद्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता बळावली आहे.