जळगाव प्रतिनिधी । ज्या प्रकारे शरीराचा डॉक्टर असतो, त्याच प्रकारे अर्थशास्त्राचे डॉक्टर म्हणजे सनदी लेखापाल (सीए) असून त्यांच्यामुळे समाजाचे आर्थिक स्वास्थ चांगले राहते. सीएंच्या परिश्रमामुळेच राज्याला वाढीव जीएसटीचा महसूल मिळाला असल्याचे कौतुकोदगार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले.
आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव सी.ए. शाखेमध्ये इनवेस्टर अवेअरनेस प्रोग्राम म्हणजेच गुंतवणूकदार जागरूकता अभियान तसेच मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. ए. सुनिल पतोडीया होते. कार्यक्रमाप्रसंगी सी. ए. सुनील पतोडीया, सी.ए. संदीप मांडवेवाला आणि सी.ए. ब्रिजमोहन अग्रवाल, गुंतवणूक तज्ञ सी. मी ए. कमल पोद्दार मुंबई हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सी. ए. शाखेचे मा. अध्यक्ष सी. ए. प्रशांत अग्रवाल, उपाध्यक्ष सी. ए. सौरभ लोढा, विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष सी. ए. विकी बिर्ला, संस्थेचे माजी अध्यक्ष सी.ए. सागर पाटणी व कमिटी सदस्या सी. ए. स्मिता बाफना व जळगाव सी. ए. शाखेचे सभासद उपस्थित होते. सी. ए. प्रशांत अग्रवाल व सी. ए . हितेश आगीवाल यांनी सर्व मान्यवरांची थोडक्यात ओळख करून आय. सी. ए. आय. ही जगातील दुसरी मोठी प्रोफेशनल आणि फायनान्शियल संस्था असून लोकामध्ये वित्तीय व्यवस्था व वित्तीय परतावे भरण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आय. सी. ए. आय. ने सुरु केलेल्या वेब साईट बद्दल सर्व सभासदांना माहिती देण्यात आली.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, ज्या प्रकारे शरिराच्या डॉक्टरशी खोटे बोलता येत नाही, त्याच प्रकारे अर्थशास्त्राच्या डॉक्टरशी म्हणजे सीएशी खोटे बोलता येत नाही. अर्थव्यवस्था सुदृढ ठेवण्याचे काम सीए करत असतात. कोरोनाच्या काळातही सीएंनी अतिशय परिश्रम करून देशाला जीएसटीच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळवून दिले. यात सर्वाधीक वाटा महाराष्ट्राला मिळाला असल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले. तर, सी. ए .चा अभ्यास हा अतिशय कठीण असून त्यासाठी भरपूर मेहनतेची गरज असते. त्यांनी सर्व सभासदांचे मनापासून कौतुक करून आयसीएआय चे नाव शिखरापर्यंत पोहचावे आणि गरज पाहूनच गुंतवणूक करावी असे आवाहन केले. त्यानंतर इनवेस्टर अवेअरनेस प्रोग्राम या चर्चासत्रामध्ये गुंतवणूक तज्ञ मा. सी. ए. कमल पोद्दार यांनी गुंतवणूकदारांना तसेच नवीन गुंतवणूक करू इच्छिणार्याना येणार्या विविध समस्या तसेच गुंतवणूक कशी, कुठे व किती करावी जेणे करून आपणास जास्तीत जास्त उत्पन्न व कमीत कमी जोखीम राहील अशा अनेक महत्वपूर्ण बाबींबद्दल जळगाव सी.ए. सभासदांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी सी. ए. पल्लवी मयुर, हितेश आगीवाल व कौशल मुंदड़ा यांचे विविध समितीवर नियुक्ति झाल्यामुळे सत्कार केला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जळगाव सी. ए. शाखेचे अध्यक्ष सी. ए. प्रशांत अग्रवाल, उपाध्यक्ष सी. ए. सौरभ लोढा, विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष सी. ए. विकी बिर्ला, संस्थेचे माजी अध्यक्ष सी.ए. सागर पाटणी व कमिटी सदस्या स्मिता बाफना यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.ए. ममता राजानी यांनी केले तर आभार प्रदर्शन सौरभ लोढा यांनी मानले.