जळगाव प्रतिनिधी । जळगाव सीए शाखेचा पद हस्तांतर सोहळा आयसीएआय भवनात पार पडला. याप्रसंगी याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. पी. पी. माहुलीकर उपस्थित होते.
या वेळी नुकत्याच झालेल्या जळगाव चार्टर्ड प्रिमीअर लीग-६ क्रिकेट स्पर्धांचे पारितोषिके देऊन तसेच सीए परीक्षेत पास झालेल्या एकूण ३५ नवीन सीएंचा अॅड. उज्ज्वल निकम व प्र-कुलगुरू पी. पी. माहुलीकर यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच जळगाव सीए शाखेतर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा सप्ताह २०१९चे पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
सीए शाखेच्या २०१९-२० या वर्षा करीता अध्यक्षपदी सीए स्मिता बाफना, उपाध्यक्षपदी सीए सागर पटणी तर सीए प्रशांत अग्रवाल यांची कोषाध्यक्ष व विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. यासोबतच सीए सौरभ लोढा याची सचिवपदी तर विकी बिर्ला यांची सभासद म्हणून निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष सीए अजय जैन यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा सीए स्मिता बाफना यांच्याकडे पदभार सोपवला.