मुंबई-वृत्तसेवा | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन राज्यपालांची नियुक्त्या जाहीर केल्या असून यात महाराष्ट्रात रमेश बैस यांची उचलबांगडी करत सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली
केंद्र सरकारने रात्री उशीर राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडूतील ज्येष्ठ स्वयंसेवक असणारे राधाकृष्णन हे सध्या झारखंडचे राज्यपाल होते. आता त्यांना महाराष्ट्रासारखे मोठे व महत्वाचे राज्य मिळाले आहे. त्यांच्या कडे तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. ते कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार म्हणून निवडून आले असून तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधानसभा सभापती हरीभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या माध्यमातून पक्षाने निवृत्ती काळात त्यांचे पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे.