चोपडा येथे महाविद्यालयात सी.ए. दोषी यांचे व्याख्यान

aab391e8 90a0 41bb 9d65 02bf61c2de9b

चोपडा, प्रतिनिधी | येथील कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवचे औचित्य साधून अर्थसंकल्प या विषयावर जळगाव येथील नामांकित सी.ए. जयेश पी. दोषी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संदीप सुरेश पाटील तसेच प्रा.डी.बी.देशमुख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.पी.बी.पवार उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.सी.आर. देवरे यांनी केले. श्री. दोषी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, साधारणत: प्रत्येकाने जेव्हा आपण बजेटचा विचार करतो तेव्हा बजेटचा महत्वाच्या म्हणजे ‘अ’ भाग लक्षात घेतला पाहिजे. कारण त्यात खरे पाहता सरकारचे नेमके पुढील वर्षांसाठी काय नियोजन आहे, ते समजते. या उलट आपण लक्ष देतो ते ‘ब’ भागाकडे. त्यामूळे अपल्याला बजेट नेमक काय आहे ? हे समजायला अनेक अडचणी येतात. संस्थेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, बजेट हा प्रत्येक व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामूळे अशाप्रकारचे मार्गदर्शन जर प्रत्येक व्यक्तीने घेतले तर खरोखरच सर्वांनाच बजेट समजून घेणे सोपे जाईल.

यावेळी शहरातील व्यापारी अशोक अग्रवाल, राम अग्रवाल, उपप्राचार्य प्रा.एम.बी. हांडे, उपप्राचार्य डॉ.के.एन. सोनवणे विविध शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शहरातील व्यापारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा.एम.बी. हांडे यांनी केले.

Protected Content