पोटनिवडणूक निकाल : मुंबईसह पुण्यात भाजपला धक्का

bjp

मुंबई प्रतिनिधी । मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील पोटनिवडणुकीतही भाजपला धक्का बसला आहे. तळेगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे.

तळेगाव नगरपरिषद पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांनी विजय मिळवला. अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांनी भाजपाच्या कृष्णा म्हाळसकर यांचा ७९५ मतांनी पराभव केला. संगीता शेळके यांना एक हजार ४५२ मतं मिळाली, तर कृष्णा म्हाळसकर यांना ६५७ मते पडली.

मुंबई महापालिकेतील मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार विठ्ठल लोकरे यांनी विजय मिळवला आहे. ते प्रभाग क्रमांक १४१ मधून विजयी झाले. लोकरेंनी भाजपा उमेदवार दिनेश पांचाळ यांचा पराभव केला. शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना चार हजार ४२७ मते मिळाली, तर भाजपच्या दिनेश पांचाळ यांना तीन हजार ४२ मते पडली. त्यामुळे एक हजार ३८५ मतांनी दिनेश पांचाळ पराभूत झाले. काँग्रेसच्या अल्ताफ काझी यांना अवघी तीनशे मते पडली. दरम्यान, विधानसभेला भाजपामधून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे यांच्या विरोधात दंड थोपटले आणि ते विक्रमी मताधिक्याने विजय झाले. त्यानंतर हळूहळू भाजपाला मावळ परिसरात उतरती कळा लागली आहे.

Protected Content