सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बामणोद येथील रहिवाशी पुणे येथे स्थायिक असलेले उद्योगपती सोपान यादव येवले यांना यांना लेवा आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते सावदा येथील माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन यांचे मुहूणे आहेत.प्रतिकूल परिस्थितीत सुरवातीच्या काळात नोकरी करीत त्यांनी पुणे येथे उद्योग उभा केला आहे आटोमोबाईल क्षेत्रात अनेक नामांकित कंपन्या त्याचे ग्राहक आहेत.
त्यांच्या 5 कंपन्या असून अनेक बेरोजगार युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध केला आहे. याच कामगिरी मुळे त्यांना लेवा आयकॉन समजभूषण गौरविण्यात आले आहे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी लेवा समाजातील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी मंत्री एकनाथ खडसे व मान्यवर यांचे हस्ते गौरव करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण प्रसंगी आ. अमोल जावळे, आमदार राजुमामा भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी व मान्यवर समाज बांधव उपस्थित होते.
लेवा आयकॉन या पुरस्काराने गौरवण्यात आल्याने सावदा येथील माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन व मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे लेवा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचे कार्य गाथा धनंजय कोल्हे यांनी तयार केली असून त्यामध्ये सोपान येवले यांचा समावेश असून हा कार्यक्रम मुंबईत पार पडला.