Home क्राईम मध्यरात्री घराकडे परतणाऱ्या व्यावसायिकाला लुटले ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

मध्यरात्री घराकडे परतणाऱ्या व्यावसायिकाला लुटले ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। भुसावळ शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मध्यरात्रीच्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाला अडवून त्याला मारहाण करत मोबाईल हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार रवींद्र सुरेश जगताप (वय ४५, रा. देवानगर, भुसावळ) हे आपला हॉटेलचा व्यवसाय आटोपून १२ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने घरी जात होते. ते जामनेर रोडवरील भिरुड हॉस्पिटलमार्गे शिक्लकर वाड्याकडून जात असताना, मागून एका अज्ञात तरुणाने त्याची दुचाकी आडविली.

रवींद्र जगताप यांनी गाडी का आडवी लावली, असे विचारले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत धमकावले. अनोळखी संशयित आरोपीने जगताप यांच्याकडे असलेल्या पैशांची मागणी केली. “माझ्याकडे पैसे नाहीत,” असे सांगितल्याचा राग मनात धरून आरोपीने जगताप यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांच्या खिशात असलेला साधारण १४ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल जबरीने हिसकावून चोरून नेला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर हे करीत आहे


Protected Content

Play sound