जळगाव -लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारातील हॉटेल साईराज समोर ट्रकने बसला मागून धडक दिल्याने बससह पुढील कारचे नुकसान होवून कार चालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी १८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारातील हॉटेल साईराज समोरील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी १८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता वाहतूकीची कोंडी झाली होती. त्यामुळे एस.टी. महामंडळाची मालवाहू बस क्रमांक (एमएच १४ बीटी ४२८) उभी असतांना मागून येणारा ट्रक क्रमांक (एमएच १९ सीवाय ६६१२) ने धडक दिली. त्यामुळे बसचे मागचे नुकसान झाले. या धडकेमुळे बसच्या पुढे उभी असलेली कार क्रमांक (एमच १० बीएम ८६१८)चे ही नुकसान झाले असून कार मधील चालक आकाश दिपक बिवाल रा. धरणगाव हे किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी बस चालक आबा मुकुंदा वाघ वय ४७ रा. एरंडोल यांनी जळगाव तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार ट्रकचालक राजेंद्र धुडकू कोळी रा. शेळगाव ता. जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे हे करीत आहे.