Home Cities जामनेर जामनेर येथे भाजपातर्फे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याचे दहन

जामनेर येथे भाजपातर्फे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याचे दहन


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो असलेला पोस्टर फाडून महापुरुषाच्या अपमान केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंतिम यात्रा काढून राजमाता जिजाऊ चौकामध्ये आव्हाड यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असून जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, नगरपालिका गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, आतिश झाल्टे, सुहास पाटील, नवल राजपूत, रवींद्र झाल्टे, मयूर पाटील, कैलास पालवे, निलेश चव्हाण, कमलाकर पाटील, भाईदास चव्हाण, प्रा. शरद पाटील, तुकाराम निकम, मुकुंदा सुरवाडे, कैलास पाटील, श्याम सावळे, सुभाष सुरवाडे, विलास पाटील, आनंदा लावरे, अशोक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound