जळगाव प्रतिनिधी | गॅसवर स्वयंपाक गॅसच्या भडक्यात साडीला आग लागून सोमवारी एक महिला भाजली गेली होती. या महिलेचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली चंद्रकांत साळुंखे (वय 35, रा.श्रीकृष्ण कॉलनी, चंदू अण्णा नगर जवळ, पोलिस लाईन जळगाव) या सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घरातील गॅसवर स्वयंपाक करत होत्या. यावेळी अचानक गॅसने भडका घेत त्यांच्या साडीचा पेट घेतला. ज्यावेळी साडीने पेट घेतला. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यांची आई मथुराबाई आधार सपकाळे आणि पती चंद्रकांत रामदास साळुंखे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. वैशाली साळुंखे यांच्या साडीने पेट घेताच. त्यांनी आरडाओरडा केल्याने गल्लीतील स्थानिक रहिवाशांनी धाव घेत आग विझवली. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश जगताप यांनी तपासणी केल्यावर 100 टक्के भाजल्या गेल्याचे सांगितले. दरम्यान आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, तेजस, कार्तिक ही दोन मुले, मुलगी चंचल असा परिवार आहे. याबाबत तालुका पोलिसात घाटानेबाबत नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेका मगन मराठे करीत आहे.