जळगाव प्रतिनिधी । आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने दफन महामोर्चातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
दफन महामोर्चाच्या मागण्या खालील प्रमाणे :-
१)आदिवासी भिल्ल समाजाची दफन भूमीची जागा ७/१२ वर नावे लावून देणे
२) सण २०२१ जनगणना सर्वे मध्ये जात प्रमाणपत्र सदरील हिंदू – भिल्ल ऐवजी आदिवासाची भिल्ल अशी जात नोंद करणे
३) आदिवासी वाढते अन्याय पाहता अट्रासिटी कायदयामध्ये अटक पूर्वक जामीन मांडण्याची तरतूद रदद करावी असा प्रस्ताव शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात यावा
४) पेसा कायदा पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी एरिया मध्ये जलद गतीने लागू करावा
५) संविधानाची अनुसूचित ५ व ६ ( जल ,जमीन ,जंगल ) यावर फक्त आदिवासी अधीकार तत्काळ
लागू करण्यात यावा.
६) मध्यप्रदेश येथील नेमवार गावात झालेल्या एकाच आदिवासी कुटुंबातील पाच लोकाची हत्या व बलात्कार करणाऱ्या आरोपींना फास्ट कोर्टात प्रकरण चालवून फाशी देण्यात यावी.
७) ज्या आदिवासीच्या जमिनी और आदिवासीकडे हस्तांतरीत झाल्या त्या सर्व हस्तांतरण बेकायदेशीर ठरवून आदिवासीना प्रत्यापित करणे या बाबत गावात जाहीर सूचना दवंडी व इंटरनेट दवारे प्रसार करावा अहवाल सादर करावे
यावेळी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या अध्यक्षा सुमित्रा पवार, कार्याध्यक्ष सुर्यकांत पवार, उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल सोनवणे, उपाध्यक्ष किशोर पवार, उत्तर महाराष्ट्र महिला प्रमुख दिपाली बांडे, संजय पवार, मोतीलाल सोनवणे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1223172594802758