Home क्राईम घरफोडी : बंद घरावर चोरट्यांनी मारला डल्ला

घरफोडी : बंद घरावर चोरट्यांनी मारला डल्ला

0
52
gharfodi
gharfodi

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मोहन नगर परिसरात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिन्यांसह ५८ हजार रूपयांचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, उज्वल दत्तात्रय ठाकूर (वय-२६) रा. मोहन नगर, वृंदावन गार्डन जवळ, जळगाव हा तरुण आपल्या आई व बहिणीसोबत वास्तव्याला आहे. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घराला कुलूप लावून नगर येथे काकाकडे भेटण्यासाठी उज्वल हा आई व बहिणीसोबत गावाला गेले होते. बंद घर पाहून अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने असा एकूण ५८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेले. दरम्यान, घराचा दरवाजा उघडे असल्याने शेजारच्यांना शंका आली. त्यांनी उज्वलला फोन करून सांगितले असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. उज्वल घरी आल्यावर घरातील सर्व सामान अस्तव्यस्त दिसून आला. याप्रकरणी बुधवार २८ एप्रिल रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात उज्ज्वल ठाकूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी करीत आहे.


Protected Content

Play sound