तांबापूरातील बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिन्यांची चोरी; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरतील तांबापुरातील बंद घरफोडून अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये रोख व ३१ हजार रुपयांचे सोने चांदिचे दागिने असा ६१ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना आज उघडकीला आली आहे. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, फुकटपुरा तांबापुरा भागातील रहिवासी शबनम बी नासीर शेख (वय-४५) या सुनबाई व मुलगी आणि नातवंडासह वास्तव्यास आहे, पती व मुले मजुरीसाठी पुणे येथे राहत असून तेथून पाठवत असलेल्या पैशांवर त्यांचा उदनिर्वाह चालतो. मुलगी सुलताना व सुनबाई शाहिदा अशा दोघांसह शबनमबी या, त्यांच्या आईकडे १४ फेब्रुवारीपासून वरणगाव येथे गेल्या होत्या. पुणे येथे काम करणारा मोठा मुलगा जाकिरशेख थेट वरणगाव येथे आजीकडे आल्याने सर्व कुटूंबीय तेथेच थांबून होते. मुलगा जाकीर व सुनबाई असे दोघेही आज गुरूवार १८ फेब्रुवारी रोजी तांबपुरा येथील घरी परतले तर, त्यांना घरचेदार उघडे दिसले व कुलूप तूटलेले होते. जाकीरने आईला फोन करुन घटनेची माहिती दिली. 

नंतर घरात शिरुन पहाणी केली असतां, आतील सर्व साहित्य अस्तव्यस्थ  फेकलेले होते, लोखंडी कपाटाचे दार तोडून आतील तिजोरी तोडून आतील ३० हजार रूपये रोख, १० हजार रूपये किंमतीची ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १५ हजाराची ६ ग्रॅम कानतले रिंगा आणि ६ हजार रूपये किंमतीचे १० भार वजनाचे पायातले पैंजन असा एकुण ६१ हजार रूपयांचा ऐवज लांबविल्याचे दिसून आले.  शबनम बीच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गफ्फार तडवी करीत आहे.

 

 

Protected Content