चाळीसगावात भरदिवसा घरफोडी ; ४२ हजारांची रोकड लंपास

images 3

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील हिरापूर रोडवरील पदमावती नगरात खडकी ग्रामपंचायतीचे कर्मचारी मंगेश रासणे यांच्या घरातून भरदिवसा ४२ हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना आज (दि.७) घडली.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगेश रासणे हे घरातून सकाळी ११.०० वाजता बाहेर पडले व रात्री ८.०० वाजता घरी परत आले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, घराचे कुलूप तोडून बाहेर फेकलेले होते, तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते. कपाटात असलेली ४२ हजाराची रोख रक्कम अज्ञात चोरटयाने लंपास केली होती. रासणे यांनी तत्काळ शहर पोलिसात तक्रार दिली असता पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकचे बापु भोसले, अभिमान पाटील, विजय शिंदे, यांनी घटनास्थळी भेट दिली व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज उशिरापर्यंत चेक करण्याचे काम सुरू होते. शहरातील वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Protected Content