Home क्राईम बंद घर फोडून अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास !

बंद घर फोडून अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास !


चाळीसगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवरील सुयश लॉन्स परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली आहे. या घटनेत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आबासाहेब देवराम जाधव (वय ६२ वर्ष, रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) हे कामानिमित्त बाहेर गेले असताना २४ मार्च रोजीपासून त्यांचे घर बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी जाधव यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट आणि इतर सामानाची उचकापाचक करून कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. फिर्यादी जाधव हे घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला, तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि योगेश माळी हे करीत आहे.


Protected Content

Play sound