धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडे येथे दोन ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आलाय. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील बोरखेडे येथील डॉ. राजेंद्र पाटील हे काही दिवसांपूर्वी आपल्या परिवारासह केरळ येथे फिरायला गेले आहेत. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडत आत प्रवेश केला. दरम्यान,डॉ.पाटील हे घरी पोहचल्यावरच नेमके काय चोरीला गेले आहे,हे समजू शकेल. दुसरीकडे बोरखेडे गावातीलच भगवान घनशाम महाजन हे आपल्या परिवारासह घराच्या गच्चीवर झोपलेले असतांना चोरट्यांनी खाली घरात प्रवेश करून कपातील ५ ग्रॅमच्या तीन अंगठ्या लांबविल्या आहेत. गावाबाहेर एका शेतात महाजन यांच्या घरातील चोरलेल्या काही वस्तू आढळून आल्या आहेत. एकाच दिवशी गावात दोन घरफोडी झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.