महिलांना शिवीगाळ करत दमदाटी; चार जणांविरोधात तक्रार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरुण परिसरातील रामनगर येथे काहीही कारण नसतांना दारुच्या नशेत महिलांना शिवीगाळ करत दमदाटी करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, रामनगर येथील रहिवासी आफरिन जमीर शेख (वय ३०) या शनिवारी रात्री घरासमोर असतांना त्यांना एकाने दारुच्या नशेत शिवीगाळ करत वाद घातला. याचदरम्यान संबंधिताच्या कुटुंबातील दोन महिला व आणखी एका जणानेही आफरीन शेख यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. याचवेळी आफरीन यांची शेजारी असलेल्या सुरेखा रविंद्र सोनवणे या भांडण सोडविण्यासाठी आले असता. त्यांनी संबंधितांनी शिवीगाळ करत दमदाटी दिली. अशा आफरीन शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सुरेश अशोक सोनार व इतर तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील हे करीत आहेत.

Protected Content