यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोळवद शिवारातील शेतात कामाला गेलेले शेतकरी यांच्या बैलगाडीला महावितरणच्या विद्युत तारांचा धक्का लागल्याने बैलजोडीचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ११ जुलै रोजी दुपारी घडली आहे. सुदैवाने बैलगाडीतील शेतकऱ्यासह इतर सहा जण बालबाल बचावले आहे.
सुनिल अशोक चौधरी रा.कोळवद तालुका यावल हे ११ जुलै रोजी सकाळच्या सुमारास आपल्या कोळवद शिवारातील आपल्या शेतमजुर सहकार्यासोबत शेती कामास गेले असता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतातील पेरणीचे काम आटोपल्यावर सुनिल अशोक चौधरी हे आपल्या मजुरांना सोबत बैलगाडीवर घरी येत असतांना रस्त्यावर महावितरणच्या शेतात लावलेल्या पोलच्या तारेला चिनी हे तुटल्याने विद्युत प्रवाह उतरला होता. त्यावेळी या ठिकाणाहून जात असलेल्या बैलगाडीला विजेचा धक्का लागल्याने दोनही बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यात शेतकऱ्याचे १ लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने प्रसंगावधान लक्षात घेत दक्षता घेवुन बैलगाडीवर बसलेले शेतमजुर यांनी तात्काळ उड्या घेतला व जीव बचावला. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे बैलजोडी ठार झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातून केली आहे.