यावल प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शासनाने देशाचा अन्नदाता शेतकरी आणि कामगार विरोधी काळे कायदे संसदेत मंजुर केले असुन हे दोघ ही कायदे देशहिताचे नसल्याने हे काळे कायदे तात्काळ मागे घ्यावे, तसेच इतर मागण्यांसाठी शहरातून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
यासाठी आज २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून त्यांच्या जयंतीपासून संपुर्ण राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने आज यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी व कामगार बचाओ दिवस तसेच काळे कायदे रद्द करण्यासाठी यावल रावेरचे आमदार शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकीसंघ यावल येथून शेतकरी बांधवांना सोबत घेऊन बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
तसेच उत्तरप्रदेश येथे वाल्मिकी समाजाच्या तरुणीवर झालेल्या अमानुष बलात्कार आणि हत्यामुळे यावल येथील वाल्मिकी समाजाच्या मंदिराजवळ मेणबत्या पेटवून तिथं मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या गुंडाराजची बळी पडलेल्या र्निभयेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परत तेथून मोर्चा तहसील कार्यलाय यावल येथे आल्यावर तिथं शेतकरी विरोधी कायदे कामगार विरोधी काळे कायदे तसेच देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेली धक्काबुक्की आणि असभ्य वागणूक आणि मोदी योगी यांच्या राज्यात झालेल्या बलात्कार सामान्य जनतेची पिळवणूक या सर्व घटनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा काँगेस कमेटीचे उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, यावल पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर विश्वनाथ चौधरी , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील, काँग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान, यावल खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरुड,समाधान पाटील,अनिल जंजाले, नितीन चौधरी, अनुसुचित जाती आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे, केतन किरंगे, फैजपूर शहराध्यक्ष रियाजभाई,नगरसेवक कलिमभाई, समीर मेमन खलील सेठ, हाजी गफ्फार शाह, रामराव मोरे, विवेक सोनार, संदीप सोनवणे, सेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष अभय महाजन, विनोद पाटील, राहुल तायडे, तौफिक भाई, सद्दाम शाह,विक्की पाटील, गजु पाटील,जावेद जनाब, आदी कार्यकर्ते युवक काँग्रेस महिला काँग्रेस सेवा फौंडेशन सर्व फ्रंटलचे अध्यक्ष कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.