मुंबईतील चार अनधिकृत बिअरबार व हॉटेलवर बुलडोझर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याप्रमाणे ठाणे, मुंबई येथील बेकायदेशीर हॉटेल आणि बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल मुंबईतील काही हॉटेल आणि बारवर कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे कारवाई दरम्यान आढळले. तर काही हॉटेल बारने अतिक्रमण केलेले आढळले.

मुंबई पोलिस व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील चार बिअर बार व हॉटेलमध्ये अनधिकृतपणे मद्य आणि बारबालांवर बंदी असतांना देखील त्यांचा या हॉटेल बारमध्ये होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच हे हॉटेल अनधिकृतरित्या चालवले जात होते. तसेच कारवाई झाली तर बार गर्लला लपवण्यासाठी येथे खास जागा देखील केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी मुंबई पालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनी मिळून चार हॉटेल बारवर छापा टाकला. या ठिकाणी अनेक बेकायदेशीर गोष्टी होत असल्याचे पथकाला आढळले. यानंतर काही जणांना ताब्यात घेऊन हे चारही हॉटेल आणि बार पाडण्यात आले आहे.

बीएमसीने आर्यन बारमध्ये पायऱ्यांखालील अनधिकृत स्टोरेज रूम तयार केली होती. तर स्टर्लिंग बारमध्ये मोकळ्या जागेत उभारण्यात आलेले अवैध पावसाळी शेड आणि स्वयंपाकघर पाडण्यात आले आहे. सांताक्रूझ पश्चिम येथील स्टार नाईट बारवरही अशीच कारवाई करण्यात आली आहे. बारचे एक पार्किंग परिसरात सुरू असलेले अवैध हॉटेल पाडण्यात आले आहे.

 

Protected Content