Home Cities एरंडोल धारागीर येथे विजेच्या धक्क्याने म्हैस ठार

धारागीर येथे विजेच्या धक्क्याने म्हैस ठार


 

एरंडोल (प्रतिनिधी) विजेच्या खांबावरील तार तुटून अंगावर पडल्यामुळे लागलेल्या विजेच्या जोरदार धक्क्यात घरासमोर अंगणात बांधलेली म्हैस ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

 

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील धारागीर येथे शनिवारी रात्री बापु डिगा पाटील यांनी आपली म्हैस नेहमीप्रमाणे घरासमोरील अंगणात बांधली. परंतू रात्री ११:३० वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या खांबावरील तार तुटून म्हशीच्या अंगावर पडली. त्यात विजेचा जोरदार धक्का लागून एक म्हैस जागीच ठार झाली. तर आणखी एक म्हैस गंभीर जखमी झाली. यासंदर्भात म्हशीचे मालक बापू डिगा पाटील व भास्कर उदेसिंग पाटील यांच्या खबरीवरून एरंडोल पो.स्टे.ला नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound