Home Cities अमळनेर पंचसुत्रे डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला – आ.अनिल पाटील

पंचसुत्रे डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला – आ.अनिल पाटील

0
28

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकारने कृषी, दळणवळण, ग्रामिण विकास, सिंचन आणि उद्योग ही पंचसूत्री डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला असल्याने ही बाब निश्चितच दूरदृष्टीपूर्ण आणि समाधानकारक असेल, अशी प्रतिक्रिया आ. अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

अमळनेर मतदारसंघाच्या बाबतीत विचार केला तर सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प असून पाडळसरे धरणाला सलग दुसऱ्या वर्षी 100 कोटींपेक्षा  जास्तीचा म्हणजे 110 कोटी निधी देऊन मोठा दिलासा दिला आहे,विशेष म्हणजे अमळनेर मतदारसंघात एकूण 250 कोटी येणाऱ्या काळात प्राप्त होणार आहेत, यातुन धरण, शेतीशिवार रस्ते,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते,महसूल सोडून इतर प्रशासकीय कार्यालयांच्या इमारतीसाठी 11 कोटी 60 लाख,अत्याधुनिक  ग्रामिण रुग्णालयाच्या इमारतीसाठी साडेसात कोटी,आणि 14 गावांना तलाठी कार्यालय इत्यादी कामे मार्गी लागणारे आहेत,यामुळे मतदारसंघातील जनतेसाठी समाधानकारक अर्थसंकल्प आहे,याशिवाय 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याने तोही मोठा दिलासा आहे,दिलासादायक अर्थसंकल्प असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यासह महाविकास आघाडी शासनाचे आम्ही विशेष आभार मानत असल्याची प्रतिक्रिया आ. अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे

 


Protected Content

Play sound