नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन या आज परंपरा मोडून काढत ब्रिफकेसऐवजी पारंपरीक लाल कापडात गुंडाळलेल्या वही-खात्यातून अर्थसंकल्प संसदेत घेऊन गेल्या आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पाआधी प्रत्येक अर्थमंत्री आजवर ब्रिफकेसमध्ये अर्थसंकल्प घेऊन जात असे. आधीपासून ही परंपरा सुरू आहे. तथापि, निर्मला सितारामन यांनी ही परंपरा मोडीत काढून भारतीय परंपरेतील वही-खात्यातून अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यासाठी घेऊन गेल्या आहेत.