जळगाव (प्रतिनिधी) जानेवारी महिन्याचे लाईट बील न भरल्यामुळे महावितरणने कंपनीने आज शुक्रवारी थेट बीएसएनएलवर शुक्रवारी कारवाई करीत विद्युत पुरवठा खंडीत केला. जळगाव शहरातील मुख्य कार्यालयासह जिल्ह्यातील चाळीसगाव, भुसावळ, चोपडा व अमळनेर येथिल कार्यालयात अंधार होवून कामकाज ठप्प झाले होते. जळगावला ऐन महिला दिनाचा कार्यक्रम सुरु असतांनाच वीज खंडीत केल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी मोदी शासनाविरोधात घोषणा दिल्याने खळबळ उडाली.
जळगाव जिल्ह्यात बीएसएनएलच्या जळगाव येथील मुख्य कार्यालयासह चाळीसगाव, भुसावळ, अमळनेर व चोपडा येथे विभागीय कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांचे वीजबील बीएसएनएलच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातुन आॅनलाईन पद्धतीने भरण्यात येते. जानेवारी महिन्याचे जिल्ह्यातील सर्व बीएसएनएल कार्यालयांचे एकुण २८ लाख, ९६ हजार, ८७२ रुपये. ८३ पैसे इतके बील महावितरणतर्फे आले होते. हे जानेवारी महिन्याचे बील भरण्यासाठी महावितरणतर्फे बीएसएनएलच्या जिल्ह्यातील सर्व कार्यालर्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या.दिलेल्या मुदतीत वीजबील न भरल्यामुळे महावितरणतर्फे शुक्रवारी थेट वीज पुरवठा खंडीत करण्याची करण्यात आला. यावेळी जळगाव कार्यालयात महीला दिनाचा कार्यक्रम सुरु होता. विनंती करुन देखील नेमका त्याचवेळी पुरवठा खंडीत केल्याने बीएसएनएलच्या महीला पुुरुष कर्मचाऱ्यांनी बाहेर येवून मोदी सरकारविरुध्द घोषणाबाजी केली.