बीएसएनएल नवीन ऑफर ; एका वर्षात देणार 1095जीबी डेटा

BSNL

नवी दिल्ली वृत्तसंस्था । रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया त्यांच्या नवीन टॅरिफ प्लॅनद्वारे वापरकर्त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे, सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल आपल्या खासगी कंपन्यांना जुन्या योजनांमधून अमर्यादित लाभ देण्याचा स्पर्धा देत आहे. बीएसएनएलची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या वार्षिक योजनेत दरमहा 1699 रुपयांमध्ये 3जीबी डेटा देण्यात येत आहे. ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंतच आहे.

365 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये युजर्सना वर्षभरासाठी एकूण 1095जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिट आणि होम नेटवर्कलवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळेल. तसंच, दररोज 100 फ्री एसएमएस देखील आहेत. म्हणजेच दररोज 3GB डेटा युजर्सना मिळेल. सुरूवातीला या प्लॅनमध्ये दररोज 2जीबी डेटा दिला जात होता, पण आता नव्या ऑफरसह कंपनी यामध्ये 1जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. तर, 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत याच प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3.5जीबी डेटा ऑफर मिळत होता. बीएसएनएलने चेन्नई आणि तामिळनाडू सर्कलसाठी 1,999 रुपयांचा वार्षिक प्लॅन सुरू केला असून 365 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 3जीबी डेटा मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 फ्री एसएमएस आणि अन्य नेटवर्कसाठी 250 मिनिट कॉलिंग आहे.

Protected Content