दगडाचे ठेचून तरूणाचा निर्घृण खून; तीन संशयित ताब्यात

अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथील के.टी. नगरच्या मागील भागात १ ऑक्टोबर रोजी सकाळी एका २८ वर्षीय युवकाच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला या युवकाच्या अज्ञात कारणासाठी खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले मात्र पोलिसांनी बारा तासाच्या आत दोघां आरोपितांना १२ तासाच्या आत अटक केली. यातील एका आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी तर दुसऱ्या आरोपीस बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली.

 

अडावद येथील के.टी.नगरच्या मागील भागात बापू हरी महाजन उर्फ गरीब वय २८ वर्ष राहणार खर्ची ता. एरंडोल हल्ली मुक्काम लोखंडे नगर अडावद ता. चोपडा याचा लाकडी दांडा व दगडाने ठेचून खून करण्याची घटना १ आक्टोंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली प्रथम दर्शनी या युवकास गावात मारहाण करून त्याच्या मृतदेह अन्य ठिकाणी टाकण्यात आल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे. घटना समजतात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेच्या पंचनामा केला. घटनेतील मयत बापू महाजन हा बऱ्याच वर्षापासून अडावद येथे मामाच्या गावाला आई सोबत रहिवास करीत होता. तो अविवाहित असून मजुरी करून गुजरानकरीत होता. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केलेले होते. चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर – पवार, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी भेट देत तपास तपासकामी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.

याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला मयताचा मामा शांताराम पुना महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेच्या रात्री मयता सोबत असणाऱ्या चौघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून तपासणी सुरू असल्याचे समजते. त्यांच्याकडून दिवसभरात कोणतीच माहिती मिळाली नाही. चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप हे दिवसभर पोलीस स्टेशनला उपस्थित राहुन घटनेच्या आढावा घेत होते. दरम्यान ग्राम पंचायतने बसविलेल्या व खाजगी बसविलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज काढून दिवसभर शोधण्यात आले. त्यातील रात्री दोन वाजता फिरणाऱ्या संशयितांचे फुटेज रात्री ९ वाजता सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी गावातली प्रमुख व्हॉट्सॲप गृपवर टाकले व संशयितांना ओळखण्याचे आवाहन केले. सदरील फुटेज गावात वाऱ्यासारखे पसरले. पोलीसांकडून रात्री १० वाजताच अरोपितांना त्याच्या राहत्या घरून उचलण्यात आले. दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Protected Content