शेंदुर्णी येथे किराणा दुकान फोडले; ९६ हजाराचा मुद्देमाल लंपास

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील नाकावरील किराणा दुकान फोडून सुमारे ९६ हजार किंमतीचे किराणा साहित्य चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

सविस्तर माहिती अशी की, नरेश शेनफडू चव्हाण (वय-६८) रा. शेंदुर्णी होळी मैदान ता. जामनेर हे आपल्या कुटुंबियासह राहतात. किराणा दुकान चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे शेदुर्णी नाका येथे पंकज प्रोव्हीजन नावाचे किराणा दुकान आहे. २६ जून रात्री ८ वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकाना बंद करून कुलूप लावून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून दुकानातील लागणारा किराणा साहित्य असा एकुण ९५ हजार ७९२ रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार २७ जून रोजी सकाळी ७.१५ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी नरेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहे.

 

Protected Content