अमळनेर (प्रतिनिधी) आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून एक सामाजिक बांधीलकी जोपासत सुभराऊ फाऊंडेशनने विट भट्टीवर काम करणाऱ्या महीला व पुरुषांच्या आरोग्याची नुकतीच आरोग्य तपासणी केली.
सुभराऊ फाऊंडेशन,अमळनेर आणि ग्रामीण रूग्णालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने टाकरखेडा व पळासदळे रस्ता लगत असलेल्या विटभट्टींवर विटा बनविणाऱ्या महिला व पुरुष मजूर व त्यांच्या मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर विटभट्टींवर आयोजित करण्यात आले होते. सदर आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे 25 ते 30 महिला व पुरुष मजूरांची तपासणी करून रक्ताचे नमुने घेण्यात आले. तसेच 10 ते 15 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी शिबिरात ग्रामीण रूग्णालयाचे आय.टी.सी.टी.समुपदेशक अश्वमेघ पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र मोरे तसेच फाऊंडेशनचे अध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांच्यासह अन्य कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.