Home क्राईम लाचखोरीच्या फास : कृषी उप अधिकाऱ्यासह दोन पंटरांच्या विरोधात गुन्हा !

लाचखोरीच्या फास : कृषी उप अधिकाऱ्यासह दोन पंटरांच्या विरोधात गुन्हा !


पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेती व्यवसायात लागणारी साहित्य कृषी विभागातील योजनेच्या माध्यमातून मिळणारी सबसिडी आपल्या पदरात पडावी अशी अपेक्षा शेतकऱ्यास होती. मात्र यासाठी संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांने चक्क सहा हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदरचा प्रकार पाचोरा तालुक्यातील जोगे वडगाव येथील शेतकऱ्यावर ओढवली. संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधुन लाचखोरास धडा शिकवला. सदरची कार्यवाही लाचलुचपत अधिकारी व पथकाने केली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

मुळ तक्रारदार हे जोगेवडगाव, ता.पाचोरा येथील रहिवासी असुन ते परिवारासह गावात राहतात. तक्रारदार यांनी शासन योजनेअंतर्गत शेती व्यवसायासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी कृषी विभागामार्फत सबसीडी मिळत असल्याने त्यांनी नांगर व रोटर खरेदी करणेकामी सबसीडी मिळणेकरीता पाचोरा कृषी कार्यालयाकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज केला होता. सदर कार्यालयाकडुन नमुद साहित्य खरेदी करण्यासाठी मंजुरी मिळाल्याने त्यांनी नांगर व रोटर खरेदी केले होते. सदर खरेदी केलेल्या साहित्याचा कृषी उप अधिकारी, कृषी कार्यालय, पाचोरा विभाग, जळगाव यांचेसोबत फोटो काढुन ते योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करून अनुदान मिळवुन देण्यासाठी पाचोरा कृषी कार्यालयाचे कृषी उप अधिकारी लिलाधर देशमुख यांनी तक्रारदार यांचेकडे ६ हजार रूपये लाच मागणी करून नमुद लाच रक्कम ही अंबेवडगाव ता. पाचोरा येथील धनदाई कृषी केंद्रचे संजय पाटील यांचेकडे देणेबाबत सांगितले होते.

त्याबाबत तक्रारदार यांनी त्यांचे विरूध्द २ फेब्रुवारी रोजी लाप्रवि जळगाव घटकाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची २ फेब्रुवारी रोजी पंचांचे समक्ष पडताळणी केली असता आलोसे देशमुख यांनी कामाचे फोटो काढुन ते योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करून अनुदान मिळवुन देण्यासाठी यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ६ हजार रूपये लाच मागणी करून तडजोड अंती ५ हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करून ते धनदाई कृषी केंद्राचे खाजगी पंटर संजय पाटील यांचेकडे देण्यास सांगितले.

देशमुख यांनी सांगितले प्रमाणे तक्रारदार हे सदर लाच रक्कम संजय पाटील यांना देण्यासाठी त्यांचे धनदाई कृषी केंद्र, आंबेवडगाव येथे गेले असता ते दुकानावर नसल्याने देशमुख यांचे सांगणे प्रमाणे सदर लाच रक्कम ही दुकानावर हजर असलेले नितीन निकम यांना सदरची रक्कम लाचेची असल्याचे जाणीव असतांनाही त्यांनी लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली म्हणुन कृषी उप अधिकारी लिलाधर देशमुख, आरोपी खाजगी इसम संजय पाटील व नितीन निकम यांचेविरूध्द पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.


Protected Content

Play sound