वाळूसाठी लाचेची मागणी : विटनेरचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | घरकुलासाठी लागणार्‍या वाळूची वाहतूक करण्यासाठी लाचेची मागणी करून स्वीकारणार्‍या तालुक्यातील विटनेर येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, विटनेर येथील २९ वर्षाच्या तक्रारदाराच्या सासर्‍यांना घरकुल मंजूर करण्यात आले होते. याचे बांधकाम करण्यासाठी त्याला वाळू हवी होती. यासाठी विटनेर येथे कार्यरत असणारे तलाठी रवींद्र काशिनाथ पाटील ( वय ५० ) यांनी दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील पाच हजार रूपयांचा पहिला टप्पा तक्रारदाराने त्यांना दिली. यानंतर या प्रकरणी त्यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर एका पथकाची निर्मिती करून सापळा रचण्यात आला.

या पथकाने रवींद्र काशिनाथ पाटील यांना उर्वरित पाच हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. त्याच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक अमोल वालझडे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी बाळू मराठे, प्रणेश ठाकूर; एन.एन. जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील रविंद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी व सचिन चाटे यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content