ब्रेंकीग : कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. दिपक शिवाजी चौधरी वय ४२ रा. झुरखेडा ता.धरणगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावात दिपक चौधरी हे शेतकरी आई, पत्नी व दोन मुलं यांच्या सोबत वास्तव्याला होत. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गुरूवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांची पत्नी छायाबाई ह्या शेतात कामासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी दिपक चौधरी हे घरी एकटेच होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. शेती करण्यासाठी त्यांनी खासगी व सोसायटीकडून ५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यात सततची नापीकी मुळे ते गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी गळफास घेतला अशी माहिती त्यांच्या गावातील नातेवाईकांनी दिली. दुपारी त्यांची पत्नी घरी आल्या तेव्हा हा प्रकार समोर आला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content